जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटी चोरी व अपहार अशा दोन वेगवेगळ्या बाबी समोर आल्या असून, दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व शहानिशा करूनच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, दूध संघातील लोणी आणि दूध भुकटी गैरव्यवराहाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला. दीड-दोन महिन्यांपूर्वी अपहार झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. त्याचाही तपास निष्पक्षपणे सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी झाल्यानंतर जे सत्य समोर येईल, तसेच तक्रार अर्जात ज्या बाबी आहेत, त्यांची शहानिशाही करण्यात येईल. पोलीस प्रशासन स्तरावर निष्पक्ष चौकशी व तपास होईल.
हेही वाचा : पाप लपविण्यासाठीच खडसेंचा आंदोलनाचा बनाव ; भाजपचा आरोप
या प्रकरणातील संशयितांवर कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला नाही, ही सर्व प्रक्रिया केली जाईल. मात्र, या प्रकरणाची शहानिशा करूनच पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात गुन्हा तर दाखल होईल; परंतु ज्या काही बाबींची शहानिशा करणे आवश्यक आहे, काही कायदेशीर बाबी तपासणे बाकी आहेत, ते करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.