दीपावली म्हणजे नावीन्य, प्रकाश, उत्साह. यंदा सणांचा राजा असलेल्या दिवाळीनिमित्त सुरू होणारा दीपोत्सव सहा दिवस रंगणार असल्याने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी शहर परिसरात आहे. दिवाळीवर ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असले तरी दिवाळीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाजारपेठेत या निमित्ताने चैतन्य पसरले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या स्वागतासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम पार पाडल्यानंतर आता खरेदीने वेग घेतला आहे. सायंकाळच्या वेळी शहरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरातील मोठय़ा मैदांनावर फटाक्यांची दुकाने लावण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय घराच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक साहित्य बाजारपेठेत आल्याने किरकोळ खरेदी सातत्याने सुरू आहे.
पंचागानुसार नरकचतुर्दशीपासून दिवाळी सुरू होत असली तरी वसुबारसने दिवाळीचे स्वागत होते. यंदा वसुबारस ते भाऊबीज असा सहा दिवस दीपोत्सव रंगणार आहे. वसुबारसनिमित्त शहरातील गो-शाळांमध्ये गाय आणि वासराचे पूजन होणार आहे. दुसरीकडे, दीपोत्सवाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या आकारांतील पणत्या, आकाशकंदील, उटणे, रांगोळी, घर सजावटीचे सामान मोठय़ा प्रमाणावर आल्याने बाजारपेठेला खरेदीचा वेगळा रंग आला आहे.
दिवाळीचे स्वागत मिणमिणत्या प्रकाशाने करणाऱ्या पणत्यांचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये साध्या लाल मातीच्या पणत्यांपासून आकर्षक रंग सजावट, कुंदन वर्क, नक्षीकाम केलेल्या पणत्या बाजारपेठेत आहे. यामध्ये नारळ, कंदील, तुळशीवृंदावन अशा आकर्षक आकारात मातीच्या पणत्या बाजारपेठात दाखल झाल्या असून त्यांना विशेष मागणी आहे.
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केल्यामुळे आकाशकंदीलाची जागा आता बांबूच्या चटईपासून तयार करण्यात आलेले तसेच कापड आणि रंगीत कागदापासून तयार करण्यात आलेले आकाशकंदील ठिकठिकाणी दिसत आहेत. साधारणत १०० रुपयांपासून पुढे याची विक्री होत आहे. त्यालाही चांगली मागणी असल्याचे दिसत आहे.
रांगोळीसाठी जाणारा वेळ पाहता वेगवेगळ्या नक्षी कामातील ठसे, स्टिकर्स, रांगोळी पेन, रंग बाजारपेठेत आले आहेत. महिलावर्गाकडून नक्षीकाम असणाऱ्या ठशांना विशेष पसंती लाभत आहे. साधारणत १०, ३० ते ५० रुपये अशा वेगवेगळ्या दरात नक्षीकामाच्या ठशांना विशेष मागणी आहे.
याशिवाय दीपोत्सवाच्या स्वागतासाठी महालक्ष्मीची पावले, लक्ष्मीच्या वेगवेगळ्या मूर्ती, तोरणे, प्लास्टिक फुले, कुंडय़ा, गालिचे असे गृहसजावटीचे सामान बाजारपेठेत महिलावर्गाला खुणावत आहे. किरकोळ खरेदीच्या धावपळीत दिवाळी फराळाच्या लगबगीने वेग घेतला आहे. दोनशे रुपयांपासून पुढे चकली, चिवडा, शेव, बालुशाही, करंजी अशा विविध खाद्यपदार्थाचा घमघमाट बाजारपेठेत दरवळत आहे. काहींनी तयार पदार्थाऐवजी मजुरी देऊन आचाऱ्याकडून खाद्य पदार्थ तयार करून घेण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळी अंकाचा नजराणा
‘दिवाळी आणि दिवाळी अंक वाचन’ हे समीकरण दिवसागणिक दृढ होत आहे. वाचकांची अभिरुची लक्षात घेता साहित्य, समाजकारण, विनोद, पर्यटन, राजकीय, आर्थिक, पर्यावरण, सिनेमा, नाटक, अनुवाद, आरोग्य, उद्योग, धार्मिक, ज्योतीष, गड-किल्ले, बालसाहित्य, कविता या विषयांवरील विविध दिवाळी अंक बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दिवाळीचे स्वागत करण्यासाठी रचना ट्रस्ट, कीर्ती कलामंदिर, कलानंद कथक संस्था आणि अभिजात नृत्य-नाटय़-संगीत अकादमीतर्फे रविवारी पहाटे साडेपाच वाजता ‘नायक-नायिका’ ही नृत्यमैफल नवरचना विद्यालयात होईल. रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी आणि विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या यात सहभागी होतील. त्यांना नितीन पवार, पुष्कराज भागवत, सुनील देशपांडे, प्रशांत महाबळ संगीतसाथ देतील. इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक भवन येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता नृत्यांगण संस्था नृत्य सादर करणार आहेत.