मनमाड : येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर  संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जातीपातीला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार शासनाकडूनच होत आहे की काय, अशी साशंकता महाराष्ट्र अंनिसने व्यक्त केली आहे. शासकीय रुग्णालयातील ‘केस पेपर’वर जातीचा उल्लेख असलेला रकाना तातडीने काढून टाकण्याची मागणी समितीने आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर ‘केस पेपर’ काढावा लागतो. त्यावर रुग्णाने जात लिहिणे बंधनकारक असल्याचा धक्कादायक प्रकार येथील उपजिल्हा रुग्णालयात उघड झाला. उपचारादरम्यान हा रकाना भरणे बंधनकारक असून तो भरण्यासाठी डॉक्टर रुग्णांची जात विचारतात, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय हे चांदवड, नांदगाव, येवला या तीनही तालुक्यांना मध्यवर्ती आहे. शहर व परिसरातील आणि ४० खेडय़ांतील रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. ‘केस पेपर’वर नऊ रकाने असून त्यात जातीचा एक आहे. रुग्णाला आपली जात सांगावी लागते. त्यानंतर  उपचार केले जातात. हा  प्रकार धक्कादायक असून यातून शासनाला  काय साधायचे आहे, जात पाहून उपचार केले जाणार काय, असे प्रश्न   आहेत.   कोणत्याही रुग्णावर त्याची जात, धर्म ,िलग, वंश पाहून उपचार केले जाऊ नयेत. असे घडत असेल तर ती सरळ सरळ भारतीय नागरिकांच्या समानतेच्या हक्काची पायमल्ली असल्याचे महाराष्ट्र अंनिसने म्हटले आहे. जात ही एक अंधश्रद्धा आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे ठाम  मत आहे. शासनसुद्धा जाती अंतासाठी प्रयत्न करत आहे. असे असताना रुग्णाला जात विचारणे हे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. जातीचा रकाना हटविण्यासाठी  शासनदरबारी प्रयत्न करत असल्याचे समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात मुलीला इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी केस पेपरवरील रकाना भरण्यासाठी जात विचारली.  शासकीय रुग्णालयात जात का विचारली जाते, असा प्रश्न मला पडला, अशी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक कल्याण धिवर यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात जातीपातीचा काही संबंध नाही. बाह्यरुग्ण पत्रिकेचा विहित नमुना हा निश्चित करण्यात आलेला असून तोच संपूर्ण महाराष्ट्रात वापरण्यात येत आहे. या नमुन्यात जात रकान्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा नमुना भरून घेताना रुग्णाला जात विचारणे क्रमप्राप्त ठरते. उपचार करताना आम्ही जात पाहत नाही. आमच्यासाठी आलेला प्रत्येक रुग्ण एकसमान आहे.

डॉ. पवन राऊत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मनमाड

Story img Loader