प्राजक्ता नागपुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विद्यार्थी प्रतिनिधींची निवड झाली नसल्याने आयोजनात अडथळे
दिवाळी सुट्टीनंतर विद्यापीठाच्या परीक्षा आटोपल्या की विद्यार्थ्यांना ‘डेज् सेलिब्रेशन’चे वेध लागतात. महाविद्यालयांच्या कट्टय़ावर त्याविषयी गप्पा रंगत आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण येत असतांना दुसरीकडे अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड झालेली नसल्याने कार्यक्रमांच्या नियोजनात अडथळे येण्याची साशंकता व्यक्त होत आहे.
‘डेज्’च्या नियोजनार्थ महाविद्यालयीन व्यवस्थापन-विद्यार्थ्यांमध्ये संवाद कोण साधणार, विद्यार्थी प्रतिनिधी नसल्याने ही जबाबदारी कोण पेलणार, या समस्यांमुळे हे उपक्रम अधांतरी राहतात की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे. या त्रांगडय़ावर काही महाविद्यालयांनी पर्यायी विद्यार्थी सभा गठीत केली आहे, तर काही ठिकाणी मोजक्या हौशी विद्यार्थ्यांवर ही जबाबदारी देण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न आहे.
शहर परिसरात सध्या कनिष्ठ, वरिष्ठ अशी ३० पेक्षा अधिक महाविद्यालये असून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे. बहुतांश महाविद्यालयात डिसेंबर-जानेवारी महिन्यात विविध डेज् साजरे केले जातात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. हे नियोजन, जबाबदारी ही त्या त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी सांभाळतो. यंदा थेट निवडणुका घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीची निवड होणार होती. मात्र शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र संपले तरी निवडणुकीचे बिगूल वाजले नसल्याने या उपक्रमांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संदर्भात विद्यार्थी नेता अॅड. अजिंक्य गिते याने सरकारच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडीच्या अध्यादेशातील त्रुटी मांडल्या. पुढील वर्षी खुल्या निवडणुका होणे अवघड आहे. महाविद्यालयांनी वार्षिक संमेलनापूर्वी निवडणुका घेतल्या तरी हे पद त्या विद्यार्थ्यांसाठी औट घटकेचे ठरेल. पहिले सत्र संपल्यानंतर उर्वरित सत्रात त्यांच्यातील नेतृत्वगुणास कितपत वाव मिळेल याबद्दल शंका आहे. शासन, विद्यापीठ, महाविद्यालय प्रशासन याबाबतीत परस्परांकडे बोट दाखवत असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होत असल्याचे अॅड. अजिंक्य म्हणाला.
विद्यार्थी प्रतिनिधी नसताना महाविद्यालयांनी तयारीला सुरुवात केली आहे. हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात वार्षिक महोत्सव होणार आहे. त्या संदर्भातील कामांसाठी विद्यार्थी समिती, छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाईल. त्यांच्यावर डेजच्या अनुषंगाने जबाबदारी दिली जाईल, असे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी सांगितले. के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड ‘डेज्’ सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासन, विद्यार्थी या दोघांची असून आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर नेमलेले विद्यार्थी प्रतिनिधी यासाठी हातभार लावणार असल्याचे नमूद केले.