शहर परिसरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ‘अत्त दीप भव’ सोशल फोरमच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयएमए सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या हस्ते होणार असून या वेळी डॉ. मंगेश थेटे, डॉ. अनिरुद्ध भांडारकर उपस्थित राहणार आहेत. बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाच्या वतीने १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात विशेष कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र राज्य पाली-संस्कृत नाटय़ स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त ‘अहं तिपिटकं बदामी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तसेच प्रा. डॉ. अनिर्वाण दश लिखित ‘इयं धम्मलिपी’ या संशोधनात्मक ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader