लहान मुलांमधील वाढता दृष्टिदोष अंधत्वासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवून शाळकरी मुलांची दृष्टी तपासणी अनिवार्य करावी, अशी मागणी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत केली आहे. यावेळी डॉ. पाटील यांनी मंत्री महाजन यांच्याशी मुलांच्या दृष्टिदोषाविषयी चर्चाही केली.शालेय मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव, अभ्यासाव्यतिरिक्त वाढता भ्रमणध्वनी, संगणक,दूरचित्रवाणीचा अतिवापर दृष्टिदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. अशातच दुर्दैवाने काही मुलांच्या दृष्टिदोषाचे वेळीच निदान झाले नाही, तर त्यांच्यात कायमचा दृष्टिदोष राहू शकतो. प्रसंगी डोळा आळशी होऊन तिरळेपणाही उद्भवू शकतो. परिणामी अशा बालकांना भविष्यात पोलीस, भारतीय सैन्यदल, रेल्वे अशा अचूक दृष्टी आवश्यक असलेल्या ठिकाणच्या नोकरीपासून वंचित राहावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा