लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गेडाम यांनी नाशिक महानगरपालिकेत आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तत्पूर्वी ते जळगावमध्ये कार्यरत होते. जळगावचा घरकुल घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे निवृत्त झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या पदावर कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयात गमे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी डॉ. गेडाम यांनी पदभार स्वीकारला. डॉ. गेडाम यांनी २०१४ मध्ये नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांच्या कामाचा धडाका नाशिककरांना दिसला होता. महापालिकेच्या कारभारात शिस्त आणण्यासाठी ते आग्रही राहिले होते. तेव्हा मुदतपूर्वीच त्यांची बदली झाली होती. त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर उतरले होते.
आणखी वाचा-नाशिकमध्ये भुसावळ दुहेरी हत्या प्रकरणातील संशयित ताब्यात
कपाट प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी गेडाम यांनी पाठपुरावा सुरू केल्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात गेले. बांधकाम व्यावसायिकांच्या चुकांवर बोट ठेवणारे, शहरात धडक अतिक्रमण मोहीम राबवत नगरसेवकांनाही दणका देणारे, उत्पन्न वाढीसाठी अकस्मात सर्वेक्षण मोहीम राबविणारे अशी डॉ. गेडाम यांची प्रतिमा निर्माण झाली होती. जळगावमध्ये कार्यरत असतानाही डॉ. गेडाम यांनी घरकूल घोटाळा बाहेर काढला आणि अनेक राजकीय दिग्गजांना तुरुंगाची वारी घडवली होती.