नाशिक – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. डॉ. विखे हे महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यमान सेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे हे पक्षीय उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याने भाजपने ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. सेना पुरस्कृत आमदार दराडे यांनी शिवसेनेच्या कुठल्याही गटात प्रवेश करणे टाळले आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 Results : नाशिकपेक्षा दिंडोरीचा निकाल लवकर – मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
birth certificate Rohingya Bangladeshi Tehsildar, Naib Tehsildar Malegaon
रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका; मालेगावचे तहसीलदार,नायब तहसीलदार निलंबित
Arvind Kejriwal bjp
दिल्लीतील मध्यमवर्गासाठी आप-भाजपमध्ये चढाओढ
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!

पक्षीय कामात व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते सक्रिय न राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देत या मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित केली. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी अर्ज दिला. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरी महायुतीत या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निकालाचा कल पाहून याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जाते. शिंदे गटाने आमदार दराडे यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यास यश आले नाही. दराडे हे देखील लोकसभेचा अंदाज घेऊन निर्णय घेणार आहेत. मागील निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात होते. आपण कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्याचे ते आजही स्पष्ट करतात. त्यामुळे ते शिंदे गटात जातील की नाही, याबाबत साशंकता आहे. या एकंदर परिस्थितीत भाजपने ही जागा ताब्यात घेण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. सोमवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या सर्व नेत्यांना आपण भेटलो. महायुतीचा उमेदवार म्हणून आपणास उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याचे डॉ. राजेंद्र विखे यांनी सांगितले.

Story img Loader