कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ येथील के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाच्या वतीने २९ फेब्रुवारी रोजी परशुराम सायखेडकर नाटय़गृहात संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ‘संत साहित्य आणि आधुनिक साहित्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी हे राहणार आहेत.
कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी केले आहे.

Story img Loader