शहराचा अत्याधुनिक चेहरा समोर आणण्यासाठी त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभदरम्यान ‘स्मार्ट सिटी’ रस्त्याच्या पुढील टप्प्यास लवकरच सुरुवात होणार आहे. या कामामुळे प्रायोगिक तत्वावर मंगळवारपासून परिसरातील हा रस्ता एका बाजूने पूर्णत: बंद करण्यात आला आहे.  हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याची वाहनचालकांना माहिती नसल्याने अनेकांना द्राविडी प्राणायाम करून इच्छितस्थळी पोहचावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीबीएस ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर एका बाजूने आदर्श शाळा, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासह हॉटेल आणि अन्य एक संस्था आहे. स्मार्ट सिटीच्या पुढच्या टप्पात रस्त्याच्या कामासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी एका बाजूने बंद केल्यास न्यायालयाच्या दिशेने असणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार आहे. याचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्यावरील एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवली. वाहतूक विभागाने अधिसूचना काढून हा रस्ता वाहतुकीसाठी एका बाजूने बंद केला. याबाबत याच रस्त्यावरील बँका, शाळा, अन्य संस्थांना याबाबत माहिती देण्याची तसदी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशन लिमिटेड आणि वाहतूक विभागाने घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याची वाहनचालकांना माहिती नसल्याने अनेकांना द्राविडी प्राणायाम करून इच्छितस्थळी पोहचावे लागले.

गंगापूर रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना वकीलवाडी, रविवार कारंजाचा मार्ग पत्करत सीबीएस गाठावे लागले, तर सिडको, सातपूर कडून येणाऱ्या वाहनांना ठक्कर बझार, टिळकवाडीमार्गे सीबीएस गाठावे लागले. वाहनचालकांच्या या द्राविडी प्राणायाममुळे वाहतूक कोंडीत भरच पडली. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी कान्हेरेवाडी, वकीलवाडी, पंडित कॉलनी अशा छोटय़ा रस्त्यांचा अवलंब केल्याने चारचाकी वाहनांमुळे या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले. दरम्यान, दुपारच्या सत्रात सीबीएस चौफुलीवरून आदर्श शाळेकडे जाणारा रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्या चौफुलीवर उतरत गर्दीतून शाळेत यावे लागले. वाहतुकीच्या या प्रयोगाविषयी शाळेला कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नसल्याचे शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांमध्ये मुलांना येणाऱ्या अडचणी पाहता पुढील टप्प्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होत असतांना शाळेच्या बस, व्हॅन, पालकांची वाहने यांची काय व्यवस्था केली, पूर्व प्राथमिक-प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी शाळेपर्यंत वाहनांच्या गर्दीतून पोहचायचे कसे,असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सायंकाळी उशीराने वाहतूक विभागाच्या आदेशाला हरताळ फासत वाहनचालकांनी बंद असलेल्या रस्त्यावर घुसखोरी करत पुढे जाणे पसंत केले.

केवळ प्रायोगिक तत्त्वावर

पुढील दोन दिवस त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा रस्ता प्रायोगिक तत्वावर एका बाजूने बंद राहणार आहे. या बंद काळात येणाऱ्या अडचणींचा विचार करत पुढील नियोजन करण्यात येईल.

– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग