गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर टायर फुटल्याने महामार्गावरील खांबावर  आदळला. त्यात ट्रॅक्टर उलटून डोक्याला मुका मार लागल्याने वीस वर्षीय युवक चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील हॉटेल स्वप्नशिल्पसमोर घडली. चिंचखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील पवन  पाटील (२०) हा कृष्णापुरी येथील एकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मनमाड उपजिल्हा रुग्णालयात जातीची विचारणा

शनिवारी गिरणा नदीपात्रातून वाळू भरून चांदवड- जळगाव महामार्गावरून पाचोरा येथे भरधाव जात असताना हॉटेल स्वप्नशिल्पसमोर ट्रॅक्टरचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर महामार्गालगतच्या वीजखांबावर आदळत उलटले. त्यात पवन पाटील याच्या डोक्याला व चेहर्‍याला मुका मार लागला. त्यात तो जागीच ठार झाला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टरमालक व त्याच्या साथीदारांनी तत्काळ तुटलेला खांब व वाळू दुसर्‍या वाहनात भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन हा आई-वडिलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे सारोळा बुद्रुक (ता. पाचोरा) येथील अविनाश देशमुख यांच्याकडे मजुरी करतात. मृत पवन याच्यामागे बहीण व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.