लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणार्या सर्जा-राजाचा पोळा सण गुरुवारी साजरा होत आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी परिस्थिती, काही दिवसांपूर्वी असलेला लम्पी आजार आणि महागाईच्या सावटामुळे पोळा सणाच्या उत्साहावर सावट आहे. खरेदीलाही फारसा उत्साह दिसून आलेला नाही. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

वर्षभर अन्नदात्यासोबत शेतात राबणाऱ्या सर्जा- राजाला एक दिवस विश्रांती मिळणारा सण म्हणजे पोळा. शेती यांत्रिकी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडे आता बैलांचे प्रमाणही कमी झाले आहे. असे असले तरी पोळा सणाला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात अजूनही पोळ्याचा उत्साह टिकून आहे. यावर्षी मात्र चित्र बदलले आहे. वाढती महागाई आणि दुष्काळाचे पोळ्यावर सावट आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी आजारातून गाय, बैल नुकतेच कुठे सावरु लागले आहेत. लम्पी हा जनावरांच्या त्वचेचा आजार संसर्गजन्य असल्याने पोळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत बैलांनी सहभाग घेतल्यास आजार होण्याची भीती अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे.

आणखी वाचा-नाशिक: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक लाच प्रकरणी ताब्यात

नांदगाव, येवला तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विविध वस्तूंच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. बैलांची वेसण ५० रुपये जोड, कासरा ८० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत, मोरखी ६० ते १३०, गोंडा ५० रुपयापुढे असे दर आहेत. वस्तू महाग झाल्या असल्या तरी शेतकरी गरजेपुरत्या खरेदी करीत आहे. दुसरीकडे, शेतीमालाला भाव नाही. दुष्काळी परिस्थिती याचा एकत्रित परिणाम यंदाच्या पोळा सणावर दिसून येत आहे. आतापर्यंत रिमझिम पावसावरच शेतकर्यांनी पेरण्या केल्या. नंतर मात्र पावसाची प्रतीक्षा अजूनपर्यंत कायम आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

कृषी संस्कृतीमध्ये पोळ्याला विशेष महत्त्व आहे. जमिनीच्या मशागतीपासून पेरणीपर्यंत आणि पेरणीपासून पीक काढण्यापर्यंत शेतकऱ्याला बैलाची मोलाची साथ मिळते. पोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यासाठी घरोघरी पूजेसाठी बाजारात मातीपासून तयार केलेले बैल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत.