नाशिक – अमली पदार्थ माफिया ललित पाटीलचे धागेदोरे जिल्ह्यातील देवळा तालुक्यापर्यंत येवून पोहोचले आहेत. ललितचा चालक सचिन वाघ याने देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे काही प्रमाणात अमली पदार्थ लपविल्याची तसेच काही अमली पदार्थ लोहोणेरजवळील गिरणा नदीपात्रात टाकल्याची कबुली दिल्याने साकीनाका पोलिसांनी देवळा तालुक्यात छापासत्र तसेच शोध मोहीम हाती घेतली आहे. सरस्वती वाडीत काही माल मिळाला असला तरी नदीपात्रातून अद्याप हाती काही लागले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांनी माफिया ललित आणि त्याचा चालक सचिन वाघ यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता चालक वाघने संबधित अमली पदार्थांची विल्हेवाट कुठे कुठे लावली, याबाबत कबुली दिल्याचे समजते. ललितचा चालक सतीश हा देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वाखारी) येथील रहिवाशी असून सरस्वतीवाडी येथील संशयित हा त्याचा नातेवाईक असल्याचे समजते. सरस्वतीवाडी येथे नातेवाईकाकडे काही प्रमाणात माल लपवून ठेवल्याचे तसेच उर्वरीत माल लोहोणेरजवळ गिरणा नदीपात्रात फेकून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहाटेपासून कार्यवाही सुरू केली.

हेही वाचा – चांदवडच्या मंदिरात कोजागिरीला दीपोत्सव; जागर जोगवात ३१ भजनी मंडळांचा सहभाग

हेही वाचा – विजयादशमीनिमित्त जळगाव सराफ बाजारास झळाळी, दरात घट

सरस्वतीवाडी येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात काही प्रमाणात माल आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात फेकून दिलेल्या अमली पदार्थांची रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. साकीनाक्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून तपास सुरू केला. सदर घटनेचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांनी गिरणा नदीपात्रावरील पुलावर गर्दी केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug seized from devla taluka search is also underway in the girna river basin lalit patil case ssb