अल्प भावाने झालेले वांदे आणि त्यातच अवकाळी पावसाचा मार अशा दुहेरी संकटात सापडलेल्या नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावच्या तरुण शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कांदा पिकात चक्क मेंढ्या चराईसाठी सोडल्या. जग पोसण्याची जबाबदारी या बळीराजावर असल्याने कांदा फेकण्यापेक्षा मुक्या जनावरांना दान करुन पुण्य कमावत असल्याचा उपरोधात्मक टोला सरकारला लगावत या शेतकऱ्याने लाखोच्या नुकसानीनंतरही आपल्याला या कृत्याबद्दल दु:ख नसल्याचे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>धुळे: ईपीएस ९५ निवृत्ती वेतनधारकांचा रास्ता रोको

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग कायमच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्याला आपली जमीन कसण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. यंदा कांद्याचे गडगडलेले भाव आणि त्यातच सहा तारखेला झालेल्या गारपीटीने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळेच सैताणे गावच्या प्रमोद पाटील या तरुण शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रात चक्क मेंढ्या चराईसाठी सोडल्या सैताण्याच्या प्रमोद पाटील या शेतकऱ्याने मराठवाड्यातील सिल्लोड येथून कांदा बियाणे खरेदी करुन लागवड केली होती. लागवडीपासून आतापर्यत त्याला दिड ते पावणेदोन लाखांचा खर्च आला. अशातच अवकाळी पावसाने पडलेला मार आणि त्यातूनही कांदा बाजारात नेवून फारकाही हातात पडणार नसल्याने पाटील यांनी दोन एकर शेतात मेंढ्या चराईसाठी सोडून दिल्या. पहिलवान म्हणून ओळखले जाणारे पाटील तसे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. अन्नदान हे पुण्यदान असुन जग पोसायची जबाबदारी या शेतकरी पोशिंद्यावर असल्याने माणसांना नाही तर जनावरांना तरी पोसलं याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.