नाशिक – रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी लक्षणीय कमी झाली. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीखाली पाणी आले. या हंगामात नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून जवळपास १० हजार ४६७ म्हणजे सुमारे साडेदहा टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे. अचानक वाढलेल्या पुरामुळे गिरणा नदीपात्रात १५ जण १७ तासांपासून अडकून पडले आहेत. रात्रीचा अंधार व गिरणा नदीच्या प्रवाहामुळे थांबलेले बचाव कार्य सोमवारी सकाळी नव्याने सुरू करण्यात आले. प्रशासनाने लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे.

जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. आठ धरणांमधून विसर्ग वाढल्याने गोदावरीसह अनेक नद्या, नाले दुथडी भरून वाहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने यंदा प्रथमच गोदावरीचे पाणी पात्राबाहेर गेले. गोदावरीच्या पाणी पातळीतील वाढीचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सायंकाळपर्यंत पाणी आले होते. दिवसभर पावसाचा कायम राहलेला जोर रात्री कमी झाला. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रात्रीपासून गंगापूरसह बहुतांश धरणातील विसर्ग टप्प्याटप्याने कमी करण्यात आला. सोमवारी सकाळी गंगापूरमधून दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्यो गोदावरीच्या पातळीत मोठी घट झाली. दुतोंड्या मारुतीचे दर्शन होऊ लागले. या दिवशी सकाळी दारणा धरणातून १६१६८ क्युसेक, भावली १२१८, कडवा ६२९८, भाम ४३७०, वालदेवी १८३, पालखेड १५०२, नांदूरमध्यमेश्वर ५४२३३ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गोदावरीच्या होळकर पुलाखालील पातळीत सकाळी सुमारे दीड हजार क्युसेकने घट झाली असून विसर्ग कमी झाल्याने ती आणखी घटणार आहे.

Second girder installation of Gokhale Bridge The other side of the bridge will be opened in the month of April Mumbai new
गोखले पुलाचा दुसरा गर्डर स्थापन; एप्रिल महिन्यात पुलाची दुसरी बाजू खुली होणार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bhamragad rain, Gadchiroli,
गडचिरोली : पुरस्थिती! मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला, ५० कुटुंबे…
CNG, CNG expensive pune, CNG Pimpri,
ऐन गणेशोत्सवात सीएनजी महागला! पुणे, पिंपरीतील बदललेले दर जाणून घ्या …
Atharvashirsha Pathan, pune, traffic pune,
पुणे : अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्यभागात उद्या पहाटे वाहतूक बदल
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
heavy rain, heavy rain predicted for mumbai, Mumbai, Konkan, weather forecast, Thane, Palghar, heatwave, low pressure, Sindhudurg,
मुंबईत शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Two youths died after drowning in Chulband reservoir gondiya
Gondia crime update : चुलबंद जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

हेही वाचा >>>Nashik Maruti Idol : नाशिकच्या पुराची पातळी दुतोंड्या मारुतीशी केव्हापासून जोडली गेली? काय आहे मूर्तीचा इतिहास?

२४ तासांत जायकवाडीला चार टीएमसीचा विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वर मार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. मुसळधार पावसाने मागील २४ तासात जायकवाडीला चार हजार तीन दशलक्ष घनफूट म्हणजे चार टीएमसीचा विसर्ग झाला आहे. एक जून ते रविवारी सकाळपर्यंत जायकवाडीला सहा हजार ४६४ दशलक्ष घनफूट म्हणजे ६.४ टीएमसी पाण्याचा विसर्ग झालेला होता. सोमवारी सकाळी हंगामातील आतापर्यंतची आकडेवारी १० हजार ४६७ दशक्ष घनफूट म्हणजे साडेदहा टीएमसीवर पोहोचल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात म्हटले आहे. सोमवारी सकाळी नांदूरमध्यमेश्वरमधून ५४ हजार २३३ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मंगळवारीही जायकवाडीसाठी चांगला विसर्ग होण्याची शक्यता आहे.

गिरणा नदीपात्रात अडकलेल्यांना आता हेलिकॉप्टरची प्रतिक्षा

गिरणा नदी पात्रात हौस म्हणून मासेमारीसाठी गेलेले १५ जणांना रात्र टेकडीवर काढावी लागले. जवळपास १७ तासांपासून ते पुरात अडकून पडले असून त्यांना वाचविण्यासाठी नाशिकहून लष्कराचे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहे. धुळे येथून आलेल्या बचाव पथकाने सोमवारी सकाळपासून मदतकार्य सुरु केले. पाण्याचा मोठा प्रवाह आणी रात्रीची वेळ यामुळे बचाव कार्यास मर्यादा आल्या होत्या. चणकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा नदीस पूर आला. धुळे व मालेगावमधील काही उत्साही लोक शहराजवळील संवदगावलगत गिरणा नदीपात्रातील मासेमारीसाठी गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून ते मासेमारी करत असताना सायंकाळी अचानक पुराचे पाणी वाढले. त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने ते तेथे अडकून पडले. संबंधितांना संपूर्ण रात्र तिथेच काढावी लागली.