नाशिक – रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी लक्षणीय कमी झाली. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीखाली पाणी आले. या हंगामात नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून जवळपास १० हजार ४६७ म्हणजे सुमारे साडेदहा टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे. अचानक वाढलेल्या पुरामुळे गिरणा नदीपात्रात १५ जण १७ तासांपासून अडकून पडले आहेत. रात्रीचा अंधार व गिरणा नदीच्या प्रवाहामुळे थांबलेले बचाव कार्य सोमवारी सकाळी नव्याने सुरू करण्यात आले. प्रशासनाने लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा