नाशिक : मुंबई येथे २२ ते २५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ‘महापेक्स-२०२५’ या राज्यस्तरीय प्रदर्शनानिमित्त सेवाग्रामपासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेली इ-सायकल फेरी गुरुवारी सकाळी नाशिकरोड येथील मुख्य टपाल कार्यालयाजवळ आली. या फेरीचा समारोप उपनगर येथील क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राजवळ झाला.

फेरीमध्ये नाशिक विभागातील टपाल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र व गोवा परिमंडळातर्फे ‘महापेक्स-२०२५’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी नाशिकरोड भागात इ सायकल फेरी फिरल्यानंतर त्र्यंबकेश्वरमार्गे इगतपुरीकडे रवाना झाली. विपश्यना केंद्रास भेट दिल्यानंतर सायंकाळी कसाऱ्याकडे मार्गस्थ झाली. या फेरीच्या माध्यमातून जागेवरच डीबीटी खाते उघडणे, पोस्टल लाइफ इन्शुरन्स उत्पादने, बचत योजना, आधार सेवा आणि विविध प्रकारचे टपाल तिकिटे, अशा टपाल खात्याच्या योजनांविषयी माहिती देण्यात आली.

Story img Loader