नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खोकसा गाव परिसरात शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य हादरे बसले. गुजरातमधील गांधीनगरच्या भूकंपमापन यंत्रात २.२ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेली. वारंवार बसणाऱ्या हादऱ्यांमुळे परिसरातील ग्रामस्थ पुरते घाबरले आहेत. ग्रामस्थ रात्र रस्त्यावरच जागून काढत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा, दापूर परिसरात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. खोकसा गाव परिसरातील जंगलांमधून येत असलेला आवाज, जमिनीत निर्माण होत असलेले कंपन याची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने ग्रामस्थ पुरते हादरले आहेत. भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणीदेखील केली आहे. तीन ते चार दिवसांपासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असतांना जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही ठोस तपासणी करण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळातच या भागात अनेक दिवसांपासून होणाऱ्या आवाजांबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या असतानाही यंत्रणेला ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून कार्यवाही करावेसे वाटलेले नाही. लोकप्रतिनिधींच्या पातळीवरही उदासीनता दिसत आहे.