Money Laundering Case Against Ex MP And Ex MLA जिल्ह्यातील राज्यसभेचे माजी सदस्य ईश्वरलाल जैन, त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्यासह २१ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून नागपूर येथील विशेष न्यायालयात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (मनी लाँडरिंग) खटला दाखल करण्यात आला आहे. संबंधित सर्व संशयितांना ३० ऑगस्ट रोजी हजर राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.

नागपूर येथील विशेष न्यायालयात दाखल खटल्यात जैन पिता-पुत्रांसह नितिका मनीष जैन, आर्या जैन, राजेश्वरी जैन, पुष्पादेवी जैन, एन. एस. दोशी, ए. आर. लांडगे, मेसर्स राजमल लखीचंद ज्वेलर्स, मेसर्स मानराज ज्वेलर्स, मेसर्स आर. एल. गोल्ड, मेसर्स राजमल लखीचंद, मे. मानराज मोटर्स, मे. मानराज ऑटोमोबाइल्स, मे. मनवी होल्डिंग, मे. आर. एल. हॉस्पिटल, मे. मानराज हाउसिंग फायनान्स, मे. छत्रपती रिअल इस्टेट अॅण्ड प्रोजेक्टस यांचाही समावेश आहे. संबंधित सर्व संशयितांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यातील तीन, चार, ७० अन्वये खटला दाखल करण्यात आला आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा >>> नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त

माजी खासदार जैन, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच विविध प्रकारच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम थकवून स्टेट बँक इंडियाची व्याजासह सुमारे ३५२ कोटी ४९ लाखांना फसवणूक केल्याची तक्रार केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) विविध कलमांतर्गत करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने त्याआधारे सखोल तपास केला. त्यात ईश्वरलाल जैन यांच्यासह अन्य संशयितांनी कर्ज मिळविण्यासाठी आर्थिक क्षमतेची बनावट कागदपत्रे सादर करण्यासह कर्जासाठी गहाण ठेवलेल्या मालमत्तांची बँकेच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री करणे, प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करणे, शेल कंपन्यांची स्थापना करणे, बनावट संचालकांची नियुक्ती करणे आदी बरेच गंभीर प्रकार केल्याचे समोर आले.

हेही वाचा >>> नाशिक : टपाल विभागातील गैरव्यवहाराच्या दोन घटना उघड

अंमलबजावणी संचालनालयाने १७ ऑगस्ट २०२३ रोजी राजमल लखीचंद समूहाच्या जळगाव, नाशिक, ठाणे येथील १३ अधिकृत कार्यालयांत आणि निवासस्थानांवर छापे टाकून यापूर्वी २४ कोटी ३६ लाख रुपयांचे दागिने, ११ कोटी २१ लाखांची रोकड, सुमारे ३१५ कोटींची चल-अचल संपत्ती जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ईश्वरलाल जैन, मनीष जैन आणि इतरांनी मिळविलेल्या बेनामी मालमत्तांसह जंगम व स्थावर मालमत्ता, तसेच पवनचक्क्या, दागिने अशी सुमारे ३१५ कोटी ६० लाखांची मालमत्ता विविध कलमांतर्गत जप्त केली आहे. त्याची न्यायनिर्णय प्राधिकरणाने १९ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या आदेशानुसार खात्री केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली होती. स्टेट बँकेने ५२६ कोटींच्या थकलेल्या कर्जाबाबत नवी दिल्ली येथे केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीवरून हे छापे टाकण्यात आले होते. त्यात बँकेसंदर्भातील कागदपत्रांसह लॅपटॉप ताब्यात घेत पथके परतली होती. यादरम्यान ईश्वरलाल जैन यांच्याकडून थकीत कर्जापैकी एकूण ४० कोटींची रक्कम भरण्यात आली होती. या कारवाईला तात्पुरती स्थगिती घेण्यात आली होती.

Story img Loader