नाशिक – इयत्ता १० वीच्या परीक्षांचे निकाल लागून १५ दिवस झाले असतानाही काही खासगी स्वयंअर्थ सहाय्यीत शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि दाखले देण्यास अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. तक्रारीची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका, असा इशारा संस्था चालकांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील काही शाळा शासकीय आदेशांना डावलून मनमानी करीत असून आम्हांला शासनाचे नियम लागू होत नाहीत, शासन पैसे देत नाही म्हणून आम्ही शिक्षण विभागाचे नियम पाळत नाही, असे पालक आणि विद्यार्थ्यांना सांगत असल्याची माहिती शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रमुख तथा नाशिक पॅरेंटस असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: मीटर वाचनाशिवाय अनेकांना सरासरी वीज देयके; अस्पष्ट नोंदींमुळे वाढीव भार

या शैक्षणिक संस्थांकडून इयत्ता पहिली ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तसेच शाळा सोडल्याचे दाखले अडवून विद्यार्थी, पालकांना सक्तीने शुल्क वसुलीसाठी सातत्याने त्रास दिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्याचे शाळा सोडल्याचे दाखले, गुणपत्रक देणे प्रलंबित असलेल्या शैक्षणिक संस्थांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>ठेवीदारांचा जळगावात थाळीनाद 

नाशिकमधील अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग काही करू शकत नाही, अशी शाळांची धारणा झाली आहे. त्यामुळे शाळा मुजोर झाल्या आहेत. शाळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही विद्यार्थ्यास शिक्षणापासून वंचित ठेवू नये. मुलांना प्राप्त संविधानिक हक्काचे हनन करून कायदा हातात घेतल्यास धडा शिकवू- नीलेश साळुंखे (शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रमुख तथा अध्यक्ष, नाशिक पॅरेंटस असोसिएशन)