नाशिक – शालेय शुल्क न भरल्याचे कारण देत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मद्य दुकानासाठी प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रयत्न, युवासेनेची निदर्शने

सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२ वी परीक्षेसाठी अर्ज भरण्यात येत आहेत. नाशिक विभागातील स्वंयअर्थसहाय्यित शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत. शालेय शुल्क न भरल्याने शाळा व्यवस्थापनाकडून परीक्षा अर्ज भरले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शालेय शुल्काच्या नावाखाली जर विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येत असेल, तसेच विद्यार्थी व पालकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येत असेल तर संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देसले यांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education board warning against schools for obstructing students while filling exam application zws