नंदुरबार : शहादा तालुक्यातील सटीपाणी गावच्या परिसरात कापसाच्या शेतात केली जाणारी गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या शेतातून गांजाची १५० झाडे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना शहादा तालुका हद्दीतील सटीपाणी गावात एकाने कपाशीच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांचे पथक सटीपाणी गावातील त्या शेताच्या दिशेने मार्गस्थ झाले. शेताकडे पोलीस येत असल्याचे पाहत संशयिताने पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र लगतच्या जंगलात तो पळून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. या शेतात सुमारे ११३ किलोग्रॅम वजनाचे सात लाख ८६ हजार ३३१ रुपये किंमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. ही झाडे गुन्ह्याच्या तपासाकामी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी संशयित गणेश भोसले ( पावरा) याच्याविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight lakhs ganja farm destroyed police shahada taluka nandurbar tmb 01