जळगाव – जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी  सायंकाळी शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात समर्थकांसह ठिय्या दिला.

हेही वाचा >>> जळगाव : तलाठ्यासह मंडळ अधिकार्‍याला दीड लाखाची लाच स्वीकारताना अटक

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दूध संघात लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनीही शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्यासंदर्भात तक्रार दिली. संघात लोणी (बटर) व दूध भुकटीतील गैरप्रकार अध्यक्षा मंदाकिनी यांनीच उघडकीस आल्याचा दावाही आमदार खडसे यांनी केला होता. लोणी व दूध भुकटीतील गैरव्यवहाराच्या पार्श्‍वभूमीवर प्रथदर्शनी दोषी आढळलेल्या संघातील प्रमुख दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आल्याचेही खडसेंनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> जळगाव : यावल वनक्षेत्रातील वनाधिकार्‍यांच्या ताब्यातील तीन संशयित फरार

शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आमदार खडसेंसह दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक फालक, वाल्मीक पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खडसे यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना चांगलेच धारेवर धरले. आधी साध्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी आता आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. गैरव्यवहार प्रकरणातील संशयितांना फरार करण्यास तुम्हीच जबाबदार आहात. तक्रार दिल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला असता, तर संशयितांना अटक करता आली असती.

हेही वाचा >>> शिरपूर तालुक्यात भूगर्भातील गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत ; चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी

दूध संघातील विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल करण्यात न आल्यामुळे दोन्ही संशयित फरार झाले असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. दूध संघात एक कोटी वीस लाखांवर अपहार झाल्याबद्दल अध्यक्षांसह कार्यकारी संचालक बुधवारी सायंकाळपासून प्रयत्न करीत असून, पोलीस मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, कार्यकारी संचालक स्वतः गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी येत आहेत, प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. अध्यक्षांसह कार्यकारी संचालक हे गैरव्यवहारासंदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन आले होते. पोलीस प्रशासन हेतुपुरस्सर व राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत ते म्हणाले की, आता चोवीस तास झाले. अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणातील जे मुख्य सूत्रधार आहेत, ते फरार झाले. पोलिसांच्या मदतीनेच आणि सहकार्यानेच ते फरार झाले. या गुन्ह्याचा तपास करण्यास आम्ही प्रयत्न करीत आहोत. पोलीस मात्र मुख्य सूत्रधारांना फरार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गुन्हा दाखल न करणे, हे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. राज्यात काय चालले आहे, कायदा-सुव्यवस्था बिघडलेली आहे. पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे संगनमत झाले आहे, म्हणूनच या गुन्ह्यातील प्रमुख संशयित फरार होऊ शकले. आता त्यांना शोधणे अवघड आहे. आता जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडून बसणार आहे, असा पवित्राही खडसेंनी घेतला.

Story img Loader