जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने सादर केलेला जाहीरनामा महाविकास आघाडीने चोरला आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच दुसऱ्याची नकल करून कोणी पास होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि धरणगाव शहरात मंगळवारी महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी पाचोऱ्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी अहिराणीतून भाषणाची सुरूवात केली. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी काही दिवसांपासून दिशाभूल सुरू केली आहे. विरोधकांकडून लाभाच्या योजनांची चौकशी करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. मात्र, तुमच्यात ती हिंमत नाही; आमचे सरकार हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे नाही, हप्ते देणारे आहे. महिलांना आम्ही आतापर्यंत पाच हप्ते दिले आहेत. नोव्हेंबरचा हप्ताही आगावू दिला आहे. आम्ही बोलतो तसे करतो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी विरोधकांची वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत. लाडक्या भावांसाठी देखील आम्ही युवा प्रशिक्षण योजना आणली आहे. महायुतीच्या १० सूत्री वचननाम्यानुसार, लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून शेतकरी सन्मान योजनेतून १५ हजार रूपये देण्यात येतील. या राज्यात कोणीच भूकेले झोपणार नाही. ज्येष्ठांना २१०० रूपये निवृत्तीवेतन, अंगणवाडी व आशा सेविकांना १५ हजार रूपये वेतन, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करून घरगुती विजबिलात ३० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

पाचोरा मतदारसंघातून वाहणाऱ्या गिरणा नदीवर प्रस्तावित असलेले बंधारे पूर्ण करून औद्योगिक वसाहत विकसित करणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ उपस्थित होते.