लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: तपासणीच्या नावाखाली दोन तोतया पोलिसांनी एका वृध्दास लुटल्याची घटना दिंडोरी रस्त्यावरील वाढणे कॉलनी भागात घडली. यावेळी वृध्दाची सोन्याची अंगठी संशयितांनी हातोहात लांबवली. या बाबत शालिग्राम मोरे (८०, गोकुळधाम अपार्टमेंट, दिंडोरी रोड) यांनी तक्रार दिली.

मोरे हे दिंडोरी रस्त्यावरील वाढणे कॉलनी भागात फेरफटका मारून एका वडाच्या झाडाखाली बसले होते. यावेळी दोघा भामट्यांनी त्यांना जवळ बोलावून पोलीस असल्याचे भासवले. तपासणी सुरू असल्याची बतावणी करीत वृध्दाची अंगझडती घेतली. यावेळी भामट्यांनी वृध्दाच्या हाताच्या बोटातील सुमारे २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी हातोहात लांबविली. संशयितांनी पलायन केल्यानंतर ही बाब वृध्दाच्या लक्षात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.