जळगाव – जिल्ह्यातील बाराही बाजार समित्यांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होतील. आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचेही बोलले जात असून, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली आहे. अपक्ष उमेदवारांनीही पक्षीय उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. अर्ज माघारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांची मनधरणी सर्व पक्षांच्या नेत्यांना करावी लागली. धरणगावमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. शुक्रवारपासून प्रचाराने वेग घेतला असून, प्रचारासाठी अवघ्या सात दिवसांचा कालावधी आहे.

जळगाव बाजार समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या मिनिटापर्यंत उमेदवारांची मनधरणी करावी लागली. १६८ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. आता १८ जागांसाठी निवडणूक आखाड्यात ५१ उमेदवार उतरले आहेत. भाजप-शिंदे गटासह महाविकास आघाडीने ११ माजी संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. माघारीनंतर आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गटात सरळ लढत होणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.२८ एप्रिलला मतदान होणार आहे. सोसायटी मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांना माघार घेण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानंतर भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षातच तासभर चर्चा सुरू होती. मुदत संपल्याने त्यांची माघार होऊ शकली नाही.

हेही वाचा >>>नाशिक : कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश

बोदवड बाजार समिती विभाजनाच्या नावाखाली निवडणूक रद्दचा निर्णय आयोगाकडे आहे. मात्र, अद्याप आयोगाचे आदेश नसल्याने निवडणूक कार्यक्रमानुसार १२५ जणांनी अर्ज माघार घेतली. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित बिघडल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीवर जागावाटपात घोळ केल्याचा आरोप करीत शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या चौघांनी अर्ज माघारी घेतले. बोदवड ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार समिती आहे. त्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसर, मुक्ताईनगर व बोदवड तालक्याचा समावेश होतो. हमाल-मापाडी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.यावल बाजार समितीसाठी १०० अर्ज माघारी घेण्यात आले. आता ४१ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी विकास पॅनल, तर भाजप-शिवसेना शिंदे गटाचे सहकार पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होईल. पाच अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी, तर सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहेते, पांडुरंग सराफ, मुन्ना पाटील करीत आहेत.

हेही वाचा >>>नाशिक : बहुतांश बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत, शिंदे गट-भाजप युती विरोधात महाविकास आघाडी मैदानात

भुसावळ बाजार समितीत माघारीच्या शेवटच्या दिवशी २९ अर्ज माघारी घेण्यात आले. आता ३८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे आमदार संजय सावकारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी, आमदार एकनाथ खडसे यांच्या पॅनलमधून कोणाचे पॅनल विजय होणार, याकडे लक्ष लागले आहे. भटक्या-विमुक्त जाती मतदारसंघात मोहम्मद नथू गवळी व जितेंद्र काटे हे दोन अपक्ष उमेदवार आघाड्यात आहेत.धरणगाव बाजार समितीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असून, १८ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणात. चोपडा बाजार समितीत तीन तिरंगी लढत होणार असल्याने निवडणूक आखाडा चांगलाच रंगणार असून, आखाड्यात ७२ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी २०१ अर्ज माघारी घेण्यात आले.अमळनेर बाजार समितीसाठी ८५ जणांनी अर्ज माघारी घेतले. आता ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडीच्या पॅनलना अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रत्यक्ष १६ जागांसाठी निवडणूक होत आहे.

पारोळा बाजार समितीसाठी तब्बल १०५ जणांनी अर्ज माघारी घेतले. आता ५० उमेदवार रिंगणात असून, तिरंगी लढत असल्यामुळे चुरशीची होत आहे. माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन याचिकांपैकी रेखा सतीश पाटील यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने निकाल देत त्यांची सेवा सहकारी गटातून महिला उमेदवारी कायम ठेवली आहे. माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या याचिकेचा निकाल बाकी आहे.
जामनेर बाजार समितीसाठी १६४ जणांनी अर्ज माघारी घेतले असून, आता ३४ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. यंदा प्रथमच भाजपने माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या समर्थकांना उमेदवारी नाकारली आहे. जैन समर्थकांकडून पाच जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, जागावाटपात बोलणी फिस्कटल्याने जैन समर्थकांनी आपले अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते. भाजप- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळत लढत होईल.

हेही वाचा >>>नाशिक : सिडकोत वाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

रावेरमध्ये ९० जणांनी अर्ज माघारी घेतले. आता ५१ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल व भाजप-शिंदे गटाचे लोकमान्य शेतकरी पॅनल यांच्या ३६ उमेदवारांखेरीज सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी नऊ अपक्ष, भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात तीन, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात दोन व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात एक, अशा पंधरा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे उत्सुकता लागून आहे.चाळीसगावमध्ये १६७ जणांनी अर्ज माघारी घेतले. आता ४२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. भाजप- शिंदे गट व महाविकास आघाडीत थेट सामना रंगणार आहे. प्रचारासाठी सात दिवसांचा अवधी मिळणार आहे.पाचोरा- भडगाव बाजार समितीसाठी विविध मतदारसंघांतून १६९ जणांनी अर्ज माघारी घेतले. ६० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट- भाजपचे शेतकरी विकास पॅनल, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पॅनल आणि भाजप पुरस्कृत स्वतंत्र गटाचे पॅनल आणि सहा अपक्ष आखाड्यात आहेत.