जळगाव – जिल्ह्यातील बाराही बाजार समित्यांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होतील. आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचेही बोलले जात असून, जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली आहे. अपक्ष उमेदवारांनीही पक्षीय उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. अर्ज माघारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांची मनधरणी सर्व पक्षांच्या नेत्यांना करावी लागली. धरणगावमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. शुक्रवारपासून प्रचाराने वेग घेतला असून, प्रचारासाठी अवघ्या सात दिवसांचा कालावधी आहे.
जळगाव बाजार समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या मिनिटापर्यंत उमेदवारांची मनधरणी करावी लागली. १६८ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. आता १८ जागांसाठी निवडणूक आखाड्यात ५१ उमेदवार उतरले आहेत. भाजप-शिंदे गटासह महाविकास आघाडीने ११ माजी संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. माघारीनंतर आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गटात सरळ लढत होणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.२८ एप्रिलला मतदान होणार आहे. सोसायटी मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांना माघार घेण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानंतर भाजपच्या काही पदाधिकार्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कक्षातच तासभर चर्चा सुरू होती. मुदत संपल्याने त्यांची माघार होऊ शकली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा