लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत कर्ज घेतलेल्या सभासदांकडून रक्कम घेऊन त्याची कोणतीही नोंद न करता त्यांना कर्जाची परतफेड केल्याचा (निरंक) दाखला देऊन दोन कोटी ३९ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी
saplings , Katai road , Dombivli,
डोंबिवलीत काटई रस्त्यावर झाडांची रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

या संदर्भात शासकीय प्रमाणित लेखा परीक्षक विष्णू वारुंगसे यांनी तक्रार दिली. एप्रिल २००७ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. माळेदुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यांच्याकडून संस्थेतील सभासदांनी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ५५९ रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज सभासदांनी संस्थेत जमा केले. त्यापोटी त्यांना निरंक म्हणजेच कोणतेही कर्ज बाकी नाही, असा दाखला देण्यात आला. संस्थेची थकबाकी वसुली प्रणाली सुरु असताना कर्जदाराकडे चौकशी केली असता त्यांनी निरंक दाखला असल्याची माहिती दिली.

आणखी वाचा-मनमाड : ढासळलेल्या रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी

तपासणीत या रकमेची नोंद कर्ज खतावणी, रजिस्टर, वसुली वही, रोजकिर्द यात आढळली नाही. संस्थेची वसुली वही व रोख किर्द व्यवहार नोंदविण्यात आले नाही. तसेच ही दोन कोटी ३९ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन संस्थेच्या या रकमेचा अपहार संगनमताने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दत्तात्रय कोरडे (टेकाडीपाडा वणी), बाजीराव भदाणे (बेलबारे,कळवण), किशोर गांगुर्डे (वणी) अशा तिघांविरोधात फसवणूक, विश्वासघात, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Story img Loader