नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पोलीस नेहमीपेक्षा अधिक कार्यरत असल्याचे चित्र असताना हिंमत वाढलेल्या टवाळखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केला. पोलीस आयुक्तांकडून शहरात कायदा व सुव्यवस्था असल्याचा दावा केला जात असताना पंचवटीत एकाच महिन्यात दोनदा पोलिसांवर हल्ले झाल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तीन टवाळखोरांना ताब्यात घेतले आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे हे सोमवारी रात्री कामावरून घरी जात असताना वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात काही टवाळखोर मद्यपान करुन धिंगाणा घालत असल्याचे त्यांना दिसले. नेमाणे यांनी त्यांना हटकताच त्यांनी नेमाणे यांच्यावर विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात नेमाणे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी नेमाणे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात पोलीस अधिकारीच सुरक्षित नसतील तर, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू असताना पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील एक विधीसंघर्षित बालक आहे.

मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
cm Eknath shinde angry rajashree ahirrao
नाशिक: देवळालीतील पेचामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त, सचिवांकडून स्थानिक पातळीवर आढावा

हेही वाचा…धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी

दरम्यान, याआधी चार ऑक्टोबर रोजी दिंडोरी नाक्यावर सराईत गुन्हेगार विकी जाधव उर्फ गट्या (रा. अवधूतवाडी) हा हातात चाकू घेत परिसरात दहशत माजवत असतांना मध्यवर्ती गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांनी त्याला हटकले असता. दोघांमध्ये झटापट झाली. संशयित गट्याने सोनवणे यांच्या पोटात चाकू खुपसत त्यांना जखमी केले होते. परंतु, त्या स्थितीतही सोनवणे यांनी त्यास पकडून ठेवले होते. आपल्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊ लागल्याने पोलीस आयुक्त आता तरी कठोर भूमिका घेतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.