नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नाशिक जिल्हा वाहतूक संघटना यांच्या वतीने २५ ते २८ मे या कालावधीत सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत सिटी सेंटर मॉलजवळ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात महिंद्रा, बॉश, एमएसएल ड्राईव्ह लाईन सिस्टीम्स लि. नाशिक, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस नाशिक, टपारिया टुल्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, युवाशक्ती स्कील, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट, नवभारत फर्टिलायझर, नवभारत फर्टिलायझर, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, नाशिक, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन अँन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि., एमएनई कॉम्पोनंट्स इंडीया प्रा. लि., मिराक्वई व्हेन्च्युअर्स प्रा. लि. , वेल्डकॉन इंडिया प्रा. लि., टेक्ना वेल्डकॉन इंडिया प्रा. लि. अशा एकूण १६नामांकित कंपन्या आणि प्रतिनिधी २१०० पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. मेळाव्यात चौथी पास, दहावी, बारावी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी आदी. विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
हेही वाचा >>>लासलगाव बाजार समितीत दोनही गट एकत्र; सभापतिपदी बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापतिपदी गणेश डोमाडे
उमेदवारांनी सेवायोजन संकेतस्थळावर नोंदणी करावी. काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.