येवला : नाशिक जिल्ह्यातील येवला हे पैठणीसाठी, पतंगोत्सवसाठी जसे प्रसिध्द आहे, तसेच अनोख्या रंगपंचमीसाठी ओळखले जाते. येवल्यात रंगपंचमीला रंगांचे सामने खेळले जातात. रविवारीही रंगपंचमीनिमित्त हे सामने रंगले. शहरातील टिळक चौक गल्लीत रंगांचे सामन्यांचा उत्साह दिसून आला. गल्लीत एका बाजूने रंगांचे पिंप ठेवलेले टॅक्टर, बैलगाडी दुसऱ्या बाजूला हळूहळू जात असतात. तसेच दुसऱ्या बाजूनेही तसेच दृश्य असते. एकमेकांसमोर दोन्ही बाजूची मंडळी येतात, तेव्हा रंग उडवले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/03/Enthusiasm-of-color-matches-on-the-occasion-of-Rang-Panchami.mp4

हे सामने सुमारे दिड तासापेक्षाही अधिक वेळ चालतात. यंदाही या सामन्यांचा आनंद येवलेकरांनी घेतला. येवल्यातील राधा वल्लभ मंदिरात गुजराती महिला मंडळामार्फत जुनी परंपरा कायम ठेवत रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी  राधा वल्लभ यांच्या मूर्तीस चंदन, केशर, विविध पाना च्या नैसर्गिक रंगाने राधा वल्लभ यांच्याबरोबर  भक्ती भाव प्रकट करत रंगपंचमी खेळण्यात आली. यावेळी उपस्थित महिला, युवतींनी श्रीकृष्ण राधेच्या नावाच्या जय घोषाच्या गजरात रंगपंचमीचा आनंद घेतला.