नाशिक – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने येथील जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शनिवार हा ४५ वा दिवस आहे. रविवारपासून आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते गावोगावी मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत. व्यापक जनजागृतीद्वारे आंदोलनात लोकसहभाग वाढविला जाणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात दररोज विविध संस्था, ग्रामस्थ, विविध समुदायातील मंडळी थेट भेट देऊन समाजाच्या आरक्षणास लेखी पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत ४५० हून अधिक पाठिंब्याची पत्रे उपोषणकर्त्यांना प्राप्त झाली आहेत. ही सर्व पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनासोबत पाठविली जाणार आहेत. मराठा समाज ४० वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. मात्र निष्क्रिय आमदार, खासदार, मंत्री व आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आता हा निर्वाणीचा लढा असल्याचे उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी म्हटले आहे. सध्या गावोगावी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक झळकत आहेत. आतापर्यंत ५५० हून अधिक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशास बंदी घालण्यात आल्याचे राम खुर्दळ यांनी सांगितले. दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. सत्ताधारी वा विरोधक सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेशास प्रतिबंध करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

devendra fadnavis interview in loksatta Varshvedh event
महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chandrashekhar Bawankule statement that Delhi victory is a testament to Prime Minister Narendra Modis leadership Pune news
दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
Police should have control over traffic system Minister of State for Home Yogesh Kadam expects
वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण हवे; गृह राज्यमंत्र्यांची अपेक्षा

हेही वाचा – नाशिक: विशेष लोक न्यायालयात २९ प्रकरणे निकाली; पक्षकार, मयतांच्या वारसांना पावणेदोन कोटींची नुकसान भरपाई

हेही वाचा – नाशिक : सरकारच्या निषेधार्थ येवल्यात मराठा आंदोलकांचे मुंडण

मराठा आरक्षणप्रश्नी व्यापक जनजागृतीसाठी रविवारपासून गावोगावी बैठकांचे सत्र राबविले जाणार आहे. आंदोलनातील काही कार्यकर्ते गावागावात बैठका घेऊन मराठा समाजाशी चर्चा करतील. मनोज जरांगे यांची भूमिका समाजापर्यंत पोहोचवली जाणार आहे. ही निर्वाणीची लढाई असून त्यात प्रत्येक समाज घटकाचे योगदान महत्वाचे असल्याचे पटवून दिले जाईल. या आंदोलनात प्रत्येकाला शक्य आहे, त्या मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन केले जाणार असल्याचे उपोषणकर्ते नाना बच्छाव, राम खुर्दळ, चंद्रकांत बच्छाव, नितीन रोटे, ॲड. कैलास खांडबहाले, ॲड. तुषार जाधव, स्वाती कदम, ॲड. शितल भोसले आदींनी म्हटले.

Story img Loader