नाशिक – गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या मूर्तीदान संकल्पनेस नाशिककरांनी नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षी या उपक्रमांतर्गत तब्बल दोन लाख २५३ मूर्तींचे संकलन झाले. तर १५३ टनहून अधिक निर्माल्यही संकलित करण्यात आले. पीओपीच्या मूर्तींचे घरीच विसर्जन करता यावे म्हणून मनपाने ९५४ किलो अमोनिअम बायकार्बोनेट पावडर मोफत वाटप केली होती. पर्यावरणस्नेही पध्दतीने विसर्जन करण्याच्या उपक्रमात अनेक सामाजिक व पर्यावरणप्रेमी संस्थांचे सक्रिय योगदान मिळाले.

हेही वाचा >>> नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकीत दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात

mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Nashik municipal corporation complaints news in marathi
नाशिक महापालिकेवर तक्रारींचा भडीमार;अतिक्रमणांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?

गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिंक तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. या प्रत्येक ठिकाणी मूर्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या मूर्ती महापालिका संकलित करते, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाते. मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोदावरीसह उपनद्यांच्या पात्रात विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृती करण्यात आली. याचे फलित मूर्ती संकलनाची आकडेवारी दोन लाखाचा टप्पा गाठण्यात झाली.

हेही वाचा >>> शिंदखेड्यात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

गुरुवारी शहरात दोन लाख २५३ मूर्तींचे संकलन करण्यात आले. पंचवटी विभागात सर्वाधिक तर नाशिक पश्चिम विभागात सर्वात कमी मूर्ती संकलित करण्यात आल्या. याच बरोबर१५३.१५५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. त्यात पंचवटी विभागात ५२.४७५ टन, नाशिकरोड १८ टन, सिडको २५.२३० टन, नाशिक पश्चिम १८.१३५ टन, नाशिक पूर्व १५.१५५ टन आणि सातपूर विभागातील २४.१६० टनाचा समावेश आहे. पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून महापालिकेने अमोनिअम बायकार्बोनेट मोफत स्वरुपात वितरित केली. गणेश भक्तांनी त्यासही चांगला प्रतिसाद दिला. पंचवटी विभागात २६३ किलो, नाशिकरोड १३५, सिडको ३२५, नाशिक पश्चिम ११६, नाशिक पूर्व २५.५, सातपूर ८७ किलो अशी एकूण ९५३.५ किलो पावडर वाटप करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मूर्ती संकलन उपक्रमात संघर्ष करियर अकॅडमी, बिटको, संदीप फाऊंडेशन, एनडीएमव्हीपी, महावीर तंत्रनिकेतन, व्ही. एन. नाईक या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय छात्र सेना पथक, सह्याद्री प्रतिष्ठान, रोटरी क्लब आदी संस्थानी सहभाग नोंदविला.

विभागनिहाय मूर्ती संकलन

पंचवटी ७७३२९

नविन नाशिक २४६१६

नाशिकरोड ४२०९६

नाशिक पूर्व १४७६५

सातपूर ३०३३०

नाशिक पश्चिम ११११७

देव द्या, देवपण घ्या उपक्रमास १३ वर्ष पूर्ण

देव द्या, देवपण घ्या उपक्रमांत यापूर्वीचे मूर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत काढुन नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली. गोदावरी नदीला प्रदुषणापासून वाचविण्यासाठी १३ वर्षांपूर्वी मूर्ती व निर्माल्य दान करण्यासाठीचा देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या निमित्ताने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखो मूर्तींचे दान नाशिककरांकडुन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे राज्यात सर्वत्र अनुकरण होत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवात सुविचार मंच व विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारी पत्रके घराघरात वाटली होती. विसर्जनाच्या दिवशी चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळपासून या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्थाही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Story img Loader