‘लोकसत्ता-नाशिक वृत्तान्त’चा दुरवस्थेवर प्रकाश 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या तसेच मुंबईकडून येणाऱ्या साईंभक्तांसाठी जवळचा असणाऱ्या तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गाच्या बिकट अवस्थेवर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाश टाकल्यावर अखेर जाग आलेल्या बांधकाम विभागाने महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.

खड्डय़ांमधून होणारे मार्गक्रमण, दुचाकींसह चारचाकींचे खड्डय़ांमुळे होणारे नुकसान यामुळे घोटी-सिन्नर महामार्गाने जाणारे सर्वच जण कमालीचे त्रस्त झाले होते. या संदर्भात बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे अनेक वेळा वाहनचालक, नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. सहा महिन्यापासून वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली. महामार्ग दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळूनही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा महामार्ग आहे की ग्रामीण भागातला खड्डय़ांचा रस्ता, असा संभ्रम निर्माण झाला होता. घोटी ते बेलगांव या दरम्यान महामार्गाची स्थिती अधिकच दयनीय झाली होती. रस्ता पूर्णत: उखडला गेल्याने मुंबई-शिर्डी अशी धावणारी वाहने, रुग्ण हतबल झाले होते. लोकप्रतिनिधींनी रास्ता रोको केला, निवेदने दिली. महिलांनी महामार्गावरील खड्डय़ात घटस्थापना केली.

खड्डय़ात वृक्षारोपण करण्यात आले. अशी वेगवेगळी आंदोलने करण्यात आल्यावरही बांधकाम विभागाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

‘नाशिक वृत्तान्त’ नेही या रस्त्याच्या अवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला. अखेर बांधकाम विभागाला दखल घेणे भाग पडले. घोटी-सिन्नर महामार्गाचे प्रवेशद्वार असलेल्या घोटी चौफुलीवर रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले असून बुधवारपासून महामार्ग दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.