नाशिक – निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड येथील सभा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा २६ मार्च रोजी मालेगाव येथे होणार आहे. खेड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावची सभाही यशस्वी करण्याचे आव्हान जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर असून या सभेसाठी नाशिक महानगरातून अधिकाधिक बळ देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार या सभेसाठी महानगरातून २० हजार कार्यकर्ते जातील, अशी अपेक्षा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांना साथ देणारे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात मालेगाव येथे रविवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठाकरे गटाच्या वतीने विभागवार बैठका घेण्याचे सत्र सध्या सुरू आहे. मालेगावची सभा खेड येथील सभेपेक्षाही विराट करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशिक महानगरातून अधिकाधिक कार्यकर्ते सभेला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार महानगरात विभागवार बैठकांवर जोर देण्यात येत आहे. बुधवारी नाशिकरोड विभागाची बैठक सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत नाशिकरोड परिसरातून दोन ते तीन हजार कार्यकर्ते सभेसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनांवर भगवे झेंडे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावणे, प्रत्येकाने आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना घेणे, या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

सातपूर येथे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत बडगुजर यांनी गद्दारांचे पितळ उघडे पाडण्यासाठी मालेगाव येथे होणाऱ्या सभेसाठी महानगरातून २० हजार कार्यकर्ते जाणार असून त्यासाठी वाहनांची खास व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा प्रक्षोभ असल्याचा दावाही त्यांनी केला. सातपूर विभागातून जास्तीत जास्त शिवसैनिक मालेगावच्या सभेसाठी जातील, असे पक्षाचे माजी गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले. महानगरातून रविवारच्या सभेसाठी एकाचवेळी सर्व कार्यकर्ते रवाना होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातून दीड हजार कार्यकर्ते जाणार

मालेगाव येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी निफाड तालुक्यातून सुमारे दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात निफाड येथे बाजार समिती सभागृहात माजी आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक झाली. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी शिवसेनेवर अनेक संकटे आली. परंतु, त्यातून तावून सुलाखून शिवसेना निघाली असल्याचे सांगितले. मालेगावच्या सभेला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दिंडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, महिला आघाडीच्या भारती जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, तालुकाप्रमुख सुधीर कराड आदी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख दराडे, कराड, खंडू बोडके, भारती जाधव यांनीही मार्गदर्शन केले.