जळगाव : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे कृषिसेवा केंद्राचा परवाना नसताना मुदतबाह्य कीटकनाशकांचा सुमारे पाच लाख ८७ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई कृषी विभागाच्या गुणवत्ता पथकाने केली. अशा प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष असून, भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

भुसावळ ता लुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील रहिवासी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडे कृषिसेवा केंद्राचा परवाना नसताना तसेच मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा करून विक्री केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या गुणवत्ता पथकाने जैन यांच्या घरात छापा टाकला. त्यात विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा साठवणूक व विक्री करीत असल्याचे आढळून आले. संशयित बन्सीलाल जैन यांच्याकडून पाच लाख ८७ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

त्याचा पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला. यावेळी वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, मनोहर पाटील, प्रशांत ठाकूर उपस्थित होते.ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकातील मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज बडे, विस्तार अधिकारी कपिल सुरवाडे यांच्या संयुक्त पथकाने केली. याप्रकरणी वरणगाव येथील पोलीस ठाण्यात नितीनचंद जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nashik Bus Accident : मुख्यमंत्री शिंदेंनी मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर केली ५ लाख रुपयांची मदत

दरम्यान, पिंपळगाव येथे मुदतबाह्य कीटकनाशकांचा विनापरवाना तसेच कुठलेही बिल न देता विक्री सुरू होती. मुदतबाह्य कीटकनाशकांमुळे पिकांवर आलेली फुलपाती गळणे यांसह पिकांवर विपरीत परिणाम होतात. कीटकनाशकांची मुदत संपल्यामुळे त्यांची परिणामकारकता वाढते. त्याचा परिणाम कीटकनाशकांची फवारणी करणारे शेतकरी, मजुरांच्या स्वास्थ्यावर होऊन परिणामी जीवही गमवावा लागू शकतो.

हेही वाचा : Nashik Bus Accident: मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा, अमित शाह मराठीत म्हणाले, “हृदय पिळवटून…”; शिंदेंनी दिले चौकशीचे संकेत

विनापरवाना, मुदतबाह्य व अवैध कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकर्‍यांची अशा पद्धतीने कोणीही फसवणूक करू नये. शेतकर्‍यांनीही विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशके न घेता अशा व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कीटकनाशके खरेदी करताना संबंधित विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांनी बिल घेणे गरजेचे आहे. – संभाजी ठाकूर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जळगाव)

Story img Loader