लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरात अनधिकृत नळ जोडण्या निदर्शनास येत असल्याने पाणी पट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महानगरपालिकेने अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी एक मेपासून राबविलेल्या अभय योजनेला आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विहित कागदपत्रे व दंडाची रक्कम भरून अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करता येईल. ही मुदत संपुष्टात आल्यावर अनधिकृत नळधारक शोधण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे. त्यात दंडाची रक्कम भरून नळ जोडणी अधिकृत न करणाऱ्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या प्लंबर विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व पाणी चोरी केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शासनाच्या दैनंदिन १३५ लिटर प्रति माणसी या निकषाच्या तुलनेत शहरात कित्येक पटीने अधिक पाणी पुरवठा होतो. पाण्याची चोरी आणि वाहिन्यांच्या गळतीमुळे दैनंदिन पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे वास्तव आहे. चोरी, छुप्या पध्दतीने घेतल्या गेलेल्या अनधिकृत नळ जोडण्या त्यास हातभार लावत आहे. अनधिकृत नळ जोडण्यांना चाप लावून उत्पन्न वाढविण्यासाठी मनपाने अभय योजना जाहीर केली होती. तिची मुदत संपुष्टात येत असताना प्रशासनाने मुदतवाढ दिली. या योजनेत विभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करून अनधिकृत नळजोडणी नियमित शुल्क व दंडाची रक्कम भरून नियमित करता येईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

हेही वाचा… International Yoga Day 2023 : आश्चर्य… कडुनिंबाच्या झाडावर योग प्रात्यक्षिके

अनधिकृत नळ जोडणी नियमित करताना मनपाचे आवश्यक ते शुल्क व अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. अभय योजनेची मुदत संपल्यानंतर अनधिकृत नळजोडणीधारक शोधण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत आढळलेल्या अनधिकृत नळ जोडणीधारकांना पाणी वापरापोटीचे शुल्क व तेवढ्याच रकमेची दंडाची आकारणी करून रक्कम वसूल केली जाईल. त्याचा विचार केल्यास पहिल्या टप्प्यातील दंडाच्या तुलनेत ही जवळपास तिप्पट रक्कम होते. या शुल्काचा भरणा केल्यानंतर अनधिकृत नळ जोडणी नियमित केली जाईल.

हेही वाचा… करंजवण पाणी योजनेतील लोकवर्गणीचा अडथळा दूर; मनमाड नगरपरिषदेला स्वहिस्सा भरण्यासाठी शासनाकडून ४७ कोटी

अनधिकृत नळ जोडणी करणाऱ्या प्लंबरचा परवाना निलंबित केला जाणार आहे. या टप्प्यात अनधिकृत नळजोडणी धारकांनी १५ दिवसांच्या आंत नळजोडणी आकार व दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला किंवा दंडात्मक रक्कम भरुन नळ जोडणी नियमित न केल्यास अशा नळजोडणीधारकांची दंडात्मक रक्कम व नळजोडणी शुल्काची रक्कम घरपट्टीवर बोजा म्हणून चढविला जाईल. अशी नळजोडणी कायम स्वरुपी बंद करण्यात येईल. संबंधित व्यक्ती घरपट्टीधारक नसल्यास मनपाच्या नियमानुसार ही रक्कम वसूल केली जाणार आहे. या प्रकरणात संबंधित नळ जोडणीधारक व त्यांना मदत करणारा प्लंबर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पाण्याची चोरी याबाबत गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. अभय योजनेंतर्गत अनधिकृत नळ जोडणीधारकांनी अनधिकृत नळ जोडणी वाढीव मुदतीत नियमित करून घ्यावी. मनपाच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.