लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: बनावट कागदपत्रांच्या आधारे कारखान्याच्या नावे परस्पर दुसरे खाते उघडून कर्मचाऱ्यांनी मालकाला अडीच कोटींना गंडविल्याचे उघड झाले आहे. बनावट बँक खाते उघडून संशयितांनी या रकमेचा अपहार केला.

याबाबत जगदिश साबू (कमलनगर,हिरावाडी) यांनी तक्रार दिली. साबू यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीत डी- ७३ या भूखंडावर कारखाना आहे. २३ नोव्हेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कारखान्यातील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या संशयितांनी कारखान्यात उत्पादित मालाच्या व्यवहारातील रकमेचा तसेच बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर कारखान्याच्या नावे सातपूर येथील सेंट्रल बँकमध्ये खाते उघडून हा अपहार केला. यात तब्बल दोन कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रुपयांचा संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित कर्मचारी अमोल पवार, भूषण पवार, सागर पाटील, आकाश वारूंगसे, निरज खेडलेकर, देवेंद्र शर्मा आणि विशाल पवार यांच्याविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion of more than 2 crores from the employees to the owner crime against seven persons mrj
Show comments