लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवित संशयितांनी एकाला सहा लाखांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत राहुल पाटील (पोकार कॉलनी, दिंडोरीरोड) यांनी तक्रार दिली.

२३ जुलै रोजी ९६६९४९६२२८ या भ्रमणध्वनी धारकाने पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे त्याने आमिष दाखविले. त्याच्या भूलथापांना पाटील बळी पडले. नंतर संशयिताने ७४१५०१०२५१ या व्हॉटसॲपवरून त्यांच्याशी वारंवार संपर्क साधून एचडीएफसी आणि युनियन बँकेच्या खात्यावर पैसे टाकण्यास भाग पाडले.

हेही वाचा… ताशी १३० किलोमीटर वेगाने सहा रेल्वे गाड्या धावण्याची चाचणी यशस्वी; भुसावळ-इगतपुरी विभागात प्रयोग

तीन ऑगस्टपर्यंत पाटील यांनी संशयिताने सांगितलेल्या बँक खात्यांवर पाच लाख ७३ हजार ३५० रुपये भरले. मात्र नंतर संशयिताने शेअर बाजारात गुंतवणूक न करताच परस्पर अपहार केल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion of six lakhs with the lure of extra refund cyber crime in nashik dvr