लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसीत असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांना रक्कम असलेला भाग उघडण्यात अपयश आल्याने रक्कम सुरक्षित राहिली.
बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चौघांनी एटीएम केंद्रात प्रवेश केला. सुरक्षारक्षकास मारहाण करून त्याचा भ्रमणध्वनी हिसकावून घेतला. एटीएम यंत्र बाहेर ओढून काढले. एटीएमची तोडफोड केली. परंतु, रक्कम असलेला भाग उघडता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फोल ठरला. सुरक्षारक्षकाने सकाळी सहा वाजता याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळाची एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी पाहणी केली.
आणखी वाचा-नाशिक, दिंडोरीत ५०० पेक्षा अधिक उमेदवार, सकल मराठा समाजाची तयारी
या एटीएम केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात चोरटे दिसून येत आहेत. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी घटनास्थळापासून ३०० मीटर पुढे मुसळगाव फाटा परिसरात आढळून आली