लोकसत्ता वार्ताहर

धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि युवतीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून संबंधित युवतीनेच ओळखीच्या युवकांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे उघड झाले आहे. खुद्द पीडित युवतीकडूनच पोलिसांना अशी माहिती देण्यात आल्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब

साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे दौलत बंगल्यात २५ नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा वाजता चार ते पाच दरोडेखोर चेहरा कापडाने झाकून शिरले. त्यांच्याकडे बंदूक आणि चाकू असे शस्त्र होते. घरातील ज्योत्स्ना पाटील (४०) यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत त्यांनी घरातील सोने,चांदीच्या दागिन्यांसह ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ज्योत्स्ना यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांचे हात-पाय आणि तोंड कापडाने बांधले. यावेळी घरात ज्योत्स्ना यांची २३ वर्षाची भाची निशा शेवाळे (रा. आदर्शनगर, साक्री) ही होती. दरोडेखोरांनी हत्यार रोखत दमदाटी करुन तिला ताब्यात घेत पळ काढला. दरोडेखोर गेल्यावर ज्योत्स्ना यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली.

आणखी वाचा-रिल बनवताना मुलींसमोर नाचणाऱ्याला पोलिसांनी उठबशा काढायला लावून नाचवला

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी लागलीच चौफेर नाकेबंदी केली. युवतीच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली आणि ती संशयितांच्या मिळून येण्याच्या संभाव्य ठिकाणी रवानाही केली. अपहृत युवतीने स्वतः तिच्या पालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस तिला आणण्यासाठी रविवारी सायंकाळी सेंधवा (मध्य प्रदेश) येथे पोहोचले. युवती सापडल्याने तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांनाही दिलासा मिळाला.

आता मात्र या घटनेची पार्श्वभूमी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. ज्या युवतीचे शस्रांचा धाक दाखवून अपहरण झाले होते, त्या युवतीनेच तिच्या संपर्कातील युवकांच्या माध्यमातून अपहरणाचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खोटा दरोडा आणि अपहरण प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.