नाशिक : चार कोटी रुपयांच्या आमदार निधीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर झाला होता. योग्य ती कागदपत्रे जोडण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यात बनावट कागदपत्रांचा समावेश होणे अतिशय गंभीर बाब आहे. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देश देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

आमदार निधीच्या कामांसाठी सादर झालेल्या बनावट प्रस्तावाने प्रशासकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. या संदर्भात कारवाईबाबत शासकीय यंत्रणांकडून परस्परांकडे बोट दाखविले जात असल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि नगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरात आमदार निधीतून कामे करताना मनपाकडून ना हरकत दाखला घेतला जातो. विविध स्वरुपाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करते. या विभागाकडून कागदपत्रांची छाननी होऊन सादर झालेल्या या प्रस्तावात कोणत्या टप्प्यावर बनावट कागदपत्रे समाविष्ट झाली यावर तर्कवितर्क व्यक्त होत आहे.

chatusutra article on constitution of india marathi news
चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
DJ ban order, Ganesh utsav, High Court mumbai,
डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती
SRA project to be done along Mumbai-Bangalore highway
पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?
under Section 294 of IPC encouraging women in dance bar to dance is not offence High Court
डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
monkeypox case confirmed in delhi centre issues advisory
दिल्लीतील संशयित रुग्णाला लागण झाल्याचे स्पष्ट; ‘मंकीपॉक्स’बाबत केंद्राच्या सूचना
Women who are part of the crowd need self-awareness
हे आत्मभान कधी येईल?
Loksatta anvyarth Bombay High Court decision Ganesha idol Immersion Ganeshotsav
अन्वयार्थ: राज्य कायद्याचे की अस्मिताकारणाचे?

हे ही वाचा…नाशिक : कांदा देशभरात पाठविण्यासाठी यंदा दुप्पट रेक,व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेची तयारी

योग्य त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती. बनावट कागदपत्रे प्रस्तावात कशी समाविष्ट झाली, त्याचा स्त्रोत काय, याची छाननी बांधकाम विभागाने करण्याची आवश्यकता बैठकीत मांडली गेल्याचे सांगितले जाते. पुढील काळात प्रस्ताव सादर करताना संबंधित विभागाला दक्षता घ्यावी लागणार आहे. उपरोक्त प्रकाराची गांभिर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाईची सूचना जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे करणार आहे.