नाशिक – शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या ३० वर्षाच्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मालेगाव : पाणीपट्टी दरवाढी विरोधात मालेगावकर आक्रमक, लोटांगण आंदोलन

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

दीपक सानप (रा. जामगाव) हे गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. पाणी सोडण्यासाठी विहिरीजवळील मोटर सुरु करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. या धक्क्याने ते बेशुद्ध झाले. अन्य लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.