ग्रामीण भागात येवला तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जळगाव-नेवूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कधी अवकाळी, तर कधी अत्यल्प पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. शेतकरी आत्महत्या करू लागला असून शासनाने आत्महत्या थांबविण्यासाठी येवला आणि निफाडमधील कांदा व द्राक्षबागा वाचविण्यासाठी पालखेड कालव्याला त्वरित पाणी सोडावे, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीज देयक माफी द्यावी, कांद्याचे निर्यातमूल्य ३१ डिसेंबपर्यंत कायमस्वरूपी शून्य करणे, मराठा आरक्षण आणि धनगर समाज आरक्षणासंदर्भात कार्यवाही करावी यांसह विविध पतसंस्था तसेच कंपन्यांमध्ये गुंतविलेले पैसे त्वरित मिळवून द्यावेत, शेतकऱ्यांनी कर्जासाठी सहकारी बँका व पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या तारण सोने, दागिन्यांचा जाहीरपणे होणारा लिलाव थांबवावा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न करता त्याआधी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शरद मंडलिक यांना या प्रसंगी देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा