मनमाड : कोकणातील बारसू येथे प्रकल्प उभारणीवरून राज्याचे वातावरण तापलेले असतांना मनमाड नजीकही असाच प्रकार घडल्याने पानेवाडी येथे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. जमीन मोजणीला स्थानिकांनी कडाडून विरोध करीत प्रशासनाला धारेवर धरले. महिलांनी रेल्वे मार्गावर धाव घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनाक्रमाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील हिंदूस्थान पेट्रोलियम या इंधन कंपनीच्या प्रस्तावित रेल्वे रॅक उभे करण्यासाठी रेल्वे सायडिंग व वॅगन गॅटरी या प्रकल्पाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या कंपनी अधिकारी आणि प्रशासनाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. प्रशासनाची धावपळ उडाली. पानेवाडी येथील हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपनीला इंधन वाहतुकीचे रेल्वे रॅक उभे करण्यासाठी उपरोक्त प्रकल्प उभारायचा आहे. त्यासाठी मनमाडपासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे जमीन संपादनाचा कंपनीचा प्रयत्न आहे. रेल्वे वॅगन प्रकल्पासाठी १४ शेतकर्यांची अंदाजे ४० एकर शेत जमीन लागणार आहे. त्यासाठी कंपनीने शेतकर्यांना नोटीस देऊन शेतजमिनी देण्याची मागणी केली होती. यापूर्वी शेतकर्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
mmrda squad action on three warehouse of sneha patil after file nomination as a independent candidate
स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीनंतर गोदामांवर कारवाई

हेही वाचा >>> नाशिकच्या सीमेवर नव्याने ४३ उंट दाखल, पांजरापोळमधील दोन उंटांचा मृत्यू

सोमवारी शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रकल्पग्रस्त शेतकरी आले होते. आम्हाला जिल्हाधिकार्यांचा शेत जमीन मोजणी करण्याचा आदेश असल्याचे प्रकल्प अधिकारी अनिल मेश्राम यांनी सांगताच शेतकरी संतप्त झाले. जमिनी आमच्या असून त्या आम्ही देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकर्यांनी घेतली. त्यामुळे मोजणी करू नका, आमची परवानगी नसतांना मोजणी का करता, असा सवाल उपस्थित केला. अधिकारी, प्रशासन कटकारस्थान करून आमच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोप करण्यात आला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, त्याचा करारनामा होत नाही, तोपर्यंत शेत जमिनीत पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने मोजणी करत असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी बळजबरीने जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर आमच्या जमिनीची किंमत द्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकास कंपनीत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, ही आमची नाईलाजाने मागणी आहे. मात्र ते ऐकून न घेता मोजणीचे आदेश काढले, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.

पोलिसांनी महिलांना रेल्वे मार्गावरून हटविले

आमचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून आमचे जीवन उद्वस्त केले जात असल्याचा आरोप महिला शेतकर्यांनी केला. आमचे म्हणणे ऐकून न घेता, मान्य न करता कुठलाही करार झालेला नसतांना बळजबरीने जमिनीची मोजणी केली जात असल्याचे म्हणत संतप्त महिलांनी जवळच असलेल्या रेल्वे मार्गावर धाव घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत महिलांना बाजुला केले. या संदर्भात मागे ज्या बैठका झाल्या त्या निष्फळ ठरलेल्या असतांना जिल्हाधिकार्यांनी मोजणीचा आदेश दिलाच कसा, असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला.