नाशिक – द्राक्ष हंगामाला सुरुवात होताच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडू लागले असून दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला येथील शेतकऱ्याकडून ४० लाखांहून अधिक किंमतीचा द्राक्षमाल खरेदी करून व्यापाऱ्याने आर्थिक व्यवहार पूर्ण केला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हस्तेदुमाला येथील गणेश महाले यांचे द्राक्षपीक काढणीला आल्यावर व्यापारी महंमद अहमद अन्वर (रा. बिहार) याने महाले यांच्याशी संपर्क साधला. महाले यांच्या शेतातील सोनाका द्राक्षे खरेदीचा व्यवहार केला. ४९ लाख, १९ हजार ५०२ रुपयांचा माल खरेदी केला. परंतु, याबाबत रोख किंवा धनादेशाद्वारे कुठलेही पैसे दिले नाही. याविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने महाले यांनी वणी पोलीस ठाण्यात अन्वरविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा