धुळे : जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे ८५५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यात रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला असून २९ गावातील दोन हजार २०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यापासून धुळे जिल्ह्यासह शहरात कधी जोरदार तर कधी तुरळक पाऊस सुरु आहे. काही तालुक्यात गारपीट झाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ८५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, बाजरी, मका, कांदा, मिरचीचे तर काही तालुक्यांमध्ये फळबागांचेही नुकसान झाले. १५ आणि १६ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ८६१ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होते. याआधी झालेल्या अवकाळीमुळे तीन हजार हेक्टर रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान नोंदविण्यात आले होते. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला अवकाळी आणि गारपीट पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अजूनही काही गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा