नाफेडने थेट बाजार समितीत खरेदीला नकार दिल्याने शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत आंदोलन करून लिलाव बंद पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही नाफेड, एनसीसीएफने कांदा खरेदी न केल्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला.
हेही वाचा >>> लम्पी आजाराचा पुन्हा फैलाव? जळगाव, धुळे जिल्ह्यात जनावरांचे आठवडे बाजार बंद
गुरूवारी दर घसरल्यानंतर जिल्ह्यात याच मुद्यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. लिलाव बंद पाडत त्यांनी नाफेड, एनसीसीएफने बाजार समितीत खरेदी करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सायंकाळी तातडीने आदेश काढत नाफेड व एनसीसीएफला थेट बाजार समितीत जाऊन खरेदीचे आदेश दिले होते. पण त्यास नाफेड व एनसीसीएफने नकार दिल्यामुळे हा तिढा कायम राहिला आहे. नाफेड बाजारात खरेदीत सहभागी न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत लिलाव बंद पाडले.