लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळसह परिसरात जल आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यात आता भुसावळ तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीपनगर वीजनिर्मिती केंद्रासमोर आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.

प्रदूषण आणि भारनियमनामुळे केळीबागा नष्ट होण्याच्या मार्गावर असून, पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमिमवर पिंप्रीसेकम संघर्ष समितीतर्फे दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराला केळीचे खोड बांधून अनोख्या पद्धतीने मरण दिन साजरा करून निषेध केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, पिंप्रीसेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, प्रगतिशील शेतकरी रविंदरसिंग चाहेल, पर्यावरण समितीचे संतोष सोनवणे यांच्यासह भुसावळसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की, महाजनकोने शेतकर्यांसाठी एक पाऊल पुढे येऊन २४ तास विजेची मागणी पूर्ण करायला हवी.

हेही वाचा… त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळात भाविक प्रतिनिधींसाठी प्रक्रिया सुरु

१५ मेपासून सुरू केलेल्या भारनियमनामुळे केळीबागांना पाणी मिळत नसल्यामुळे घड नष्ट होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सामाजिक दायित्व म्हणून नेहमीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे. दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्प प्रशासनाने दखल घ्यावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest in front of deepnagar power station in jalgaon dvr