धुळे – नाशिक जिल्ह्यातील अमली पदार्थ प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांचाही हात आहे, असा आरोप आमदार फारूक शहा यांनी शनिवारी रात्री केला.
एका विकास कामाच्या उद्घाटनानंतर आमदार शहा यांनी ही प्रतिक्रिया दिली. वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध मागील विधीमंडळ अधिवेशनावेळी आपण आंदोलन केले होते. त्यावेळी महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन गृहमंत्र्यांनी दिले होते.परंतु, अद्यापही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. संबंधित प्रकरणांची चौकशी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती, त्यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने पुढील आठवड्यात गृहमंत्र्यांना भेटून महानिरीक्षकांची तक्रार करणार असल्याचे आमदार शहा यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील अमली पदार्थ प्रकरणातही बी. जी. शेखर पाटील यांचा हात असल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नाशिक: जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेद्वारे ५७१ प्रकरणे निकाली
आमदार शहा यांनी तशी तक्रार केली तर आपण त्यांच्याविरुद्ध बदनामी केल्याबद्दल कारवाई करू. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीबद्दल त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना बोलावण्यात आले होते, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अनेकदा भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रतिसाद मिळाला नाही.- बी. जी. शेखर पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, ,नाशिक परिक्षेत्र)